मुंबई : बुलेट ट्रेनविरोधात मनसे राष्ट्रपतींना 50 हजार पत्र पाठवणार!
Continues below advertisement
बुलेट ट्रेनविरोधात आंदोलनं छेडल्यानंतर मनसेने आता राष्ट्रपतींकडे धाव घेतली आहे. महाराष्ट्र आणि गुजरातला जोडणाऱ्या बुलेट ट्रेनसाठी जागा संपादित करण्याचं काम महाराष्ट्रात सुरु झालं आहे. या विरोधात जाऊन मनसेने आंदोलनं केली, मात्र तरीही भूसंपादनाचं काम सुरुच असल्याने मनसेने राष्ट्रपतींना पत्र पाठवायला सुरुवात केली आहे. येत्या काळात तब्बल 50 हजार पत्र पाठवण्यात येणार असल्याचं मनसेच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. राज्यात रेल्वेची अवस्था बिकट असताना बुलेट ट्रेनचा घाट कशाला असा मजकूर या पत्रात लिहिण्यात आला आहे.
Continues below advertisement