मुंबई : दलित अत्याचाराविरोधातील काँग्रेसच्या लाक्षणिक उपोषण कार्यक्रमाची वेळ हुकली
Continues below advertisement
अॅट्रसिटी कायद्यातील बदलांना विरोध, भारत बंदवेळी दलितांवर झालेल्या अत्याचारांविरोधात काँग्रेसनं पुकारलेल्या एकदिवसीय लाक्षणिक उपोषणाचा मुहूर्त लांबत चालला आहे. कारण अखिल भारतीय पातळीवर सकाळी 10 वाजता सुरु होणारं उपोषणाचा कार्यक्रम 11 वाजेनंतरही सुरु झालेला नाही. नवी दिल्लीत स्वत: राहुल गांधी राजघाटावर उपोषणाला बसणार आहेत. तर इकडं महाराष्ट्रात मुंबईमध्ये संजय निरुपम अमर जवान पुतळ्यापाशी उपोषण करणार आहेत. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण परभणीत उपोषण करणार आहेत. सुशीलकुमार शिंदे सोलापुरात उपोषण करणार आहेत. शिवाय जिल्ह्याजिल्ह्यात काँग्रेस कार्यकर्ते उपोषण करुन मोदी सरकारच्या दलितविरोधी धोरणांचा निषेध करणार आहेत.
Continues below advertisement