मुंबई : दाऊद इब्राहिमच्या मुंबईतल्या तिन्ही संपत्तींची 9 कोटींना विक्री
एकूण 9 कोटी रुपयांना दाऊदच्या मुंबईतील 3 संपत्तीची विक्री केली गेली. एसयूबीटी बुरहानी ट्रस्टनं दाऊदच्या या तिन्ही संपत्तींची खरेदी केली. अफरोज हॉटेल, डांबरवाला इमारतीतल्या 5 खोल्या आणि एका रेस्टॉरंट अशा संपत्तींचा यात समावेश आहे. बुरहानी ट्रस्टशिवाय सर्वोच्च न्यायालयाचे वकील भूपेंद्रा भारद्वाज यांनी देखील या लिलाव प्रक्रियेत सहभाग घेतला होता. मात्र त्यांच्यासह इतरांची बोली यशस्वी ठरु शकलेली नाही.