मुंबई : मुस्लिम महिलांनी पुरुषांच्या फुटबॉल मॅच बघणं इस्लामविरोधी, दारुल उलूम देवबंदचा फतवा
Continues below advertisement
दारुल उलूम देवबंदने आणखी एक वादग्रस्त फतवा काढलाय. मुस्लिम महिलांनी पुरुषांना फुटबॉल खेळताना पाहणं हे इस्लामच्या विरोधात असल्याचं देवबंदचे मुफ्ती अतहर कासमींनी म्हटलंय. उघड्या पायांनी फुटबॉल खेळणाऱ्या पुरुषांना बघणं हे शरियतच्या नियमांच्या विरोधात असून ते मुस्लिम महिलांसाठी हराम असल्याचंही त्यांनी म्हटलंय. महिलांना टीव्हीवर फुटबॉलच्या मॅच पाहु देणाऱ्या नवऱ्यांनाही या मुफ्ती महाशयांनी फटकारलंय. या फतव्यावरुन आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement