मुंबई : पावसामुळे पुण्याकडे जाणाऱ्या अनेक एक्स्प्रेस गाड्या रद्द, प्रवाशांचे हाल
मुंबई आणि परिसरात मुसळधार पाऊस पडतोय. यामुळे सध्या मुंबईत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालीय. वेस्टन एक्स्प्रेस हायवे, दादर परिसरात मोठ्या प्रमाणआवर वाहनांच्या रांगा लागल्या लागल्या आहेत. मध्य रेल्वे तासभर उशिरानं धावत आहे तर भाईंदरपर्यंत पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरु आहे. पण तीही अर्धा तास उशिरानं आहे. काही वेळापूर्वी हार्बर मार्गावरील मानखुर्द स्टेशनवर पाणी साचल्यानं रेल्वे वाहतूक खोळंबली होती. पण सध्या हार्बर मार्गावरील वाहतूक सुरु करण्यात आली आहे. तर तिकडे मध्य रेल्वेरुन पुण्याला जाणाऱ्या आणि येणाऱ्या गाड्या आज धावणार नाहीत.