मुंबई : राज ठाकरेंच्या 'कृष्णकुंज'बाहेर फेरीवाले बसणार?
फेरीवाल्यांवरुन राज्यभरात आंदोलन छेडणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घराबाहेरच आता फेरीवाले बसणार आहेत. फेरीवाला धोरणानुसार हॉकर्स झोन तयार करण्यात आले असून त्यापैकी एक हॉकर्स झोन हा राज ठाकरे यांच्या घरासमोर आणि घराच्या मागच्या बाजूला असणार आहे.