मुंबई : मुंबई डबेवाला संघटनेत उभी फूट, सुभाष तळेकरांना प्रवक्ते पदावरुन हटवलं
Continues below advertisement
मॅनेजमेंट गुरू म्हणून जगभर ख्याती मिळवलेल्या मुंबईच्या डबेवाला संघटनेमध्ये उभी फूट पडली आहे. डबेवाल्याचे नेते सुभाष तळेकर आणि उल्हास मुके असे दोन गट पडले असून डबेवाल्यांच्या या दोन गटातील संघर्ष विकोपाला गेला आहे. सुभाष तळेकर यांना मुंबई डबेवाल्यांचे प्रवक्ते या पदावरुन दूर करण्यात आलंय. तसेच फसवणूकीप्रकरणी तळेकर यांच्या विरोधात शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. डबेवाल्यांच्या नावाचा गैरवापर करुन स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी आणि प्रसिद्धीसाठी खोट्या बातम्या देऊन संघटनेची फसवणूक करत आहेत, असे आरोप तळेकर यांच्यावर करण्यात आले.
Continues below advertisement