मुंबई | क्रिस्टल टॉवर आग प्रकरणी बिल्डरला अटक

परळमधील 17 मजली क्रिस्टल टॉवरला लागलेल्या आग प्रकरणी बिल्डर अब्दुल रझाक सुपारीवाला याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. विनोद दत्ताराम मयेकर यांनी केलेल्या तक्रारीनंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अग्निशमन यंत्रणा जाणीवपूर्वक बंद ठेवल्याचा आरोप क्रिस्टल टॉवरच्या बिल्डर अब्दुल रझाकवर ठेवण्यात आला आहे. बिल्डरविरोधात आयपीसी कलम 304, 336,337, 338 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola