मुंबई : करी रोड पूलाच्या पाडकामाला स्थानिकांचा विरोध
Continues below advertisement
लोअर परेलचा रेल्वे पूल वाहतूक आणि पादचाऱ्यांसाठी बंद करण्यात आला आहे. तर दुसरीकडे मुंबई महापालिकेनं करीरोड स्टेशनवरील पुलाच्या पाडकामाला सुरुवात केली आहे. त्यामुळे गैरसोय होत असल्याचं सांगत रहिवाशांनी करी रोडचा पूल पाडायला विरोध केला आणि गोंधळ घातला. शेवटी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत हस्तक्षेप केला. सोबत पाडकामाची ऑर्डर न आणल्यामुळे बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी पूल पाडकाम थांबवलं.
Continues below advertisement