मुंबई : मुंबई विमानतळावर अंडर 19 क्रिकेट संघाच्या स्वागतासाठी चाहत्यांची गर्दी
Continues below advertisement
न्यूझीलंडमध्ये झालेल्या अंडर नाईन्टिन विश्वचषक विजेत्या पृथ्वी शॉच्या युवा टीम इंडियाचं आज मुंबईत आगमन झालं. मुंबई विमानतळावर भारताच्या या युवा शिलेदारांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. भारतीय अंडर नाईन्टिन संघानं विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा आठ विकेट्सनी धुव्वा उडवला होता. या विजयासह भारतानं चौथ्यांदा अंडर नाईन्टिन विश्वचषकावर आपलं नाव कोरलं होतं. याआधी मोहम्मद कैफ, विराट कोहली आणि उन्मुक्त चंदच्या नेतृत्वाखाली भारतानं अंडर नाईन्टिन विश्वचषक पटकावला होता.
Continues below advertisement