मुंबई : ग्रँट रोड स्थानकाजवळील पुलाला तडे, वाहतूक बंद
Continues below advertisement
अंधेरीतला गोखले पूल खचल्यानंतर आता ग्रँट रोड स्टेशनजवळच्या पुलाला तडे गेल्याच निदर्शनास आलं आहे. ग्रँट रोड आणि नाना चौकाला जोडणारा हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. महापालिकेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून तपासणीनंतरच पुलाबाबत पुढील निर्णय घेतला जाणार आहे. या पुलावरील वाहतूक केनेडी पुलावरुन आणि अन्य मार्गांवरुन वळवण्यात आली आहे. प्रभाग अधिकारी, अग्निशमन दल आणि वाहतूक पोलिसांचे पथकही घटनास्थळी दाखल झालं आहे. सुरक्षेच्या दृष्टीने हा पूल बंद करण्यात आला आहे.
Continues below advertisement