मुंबई : इंधन दरवाढीविरोधात सलग दुसऱ्या दिवशी काँग्रेसचं आंदोलन
Continues below advertisement
पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीविरोधात सलग दुसऱ्या दिवशी मुंबईत काँग्रेसने आंदोलन केलं. मुंबईच्या मुलुंडमधील लाल बहादूर शास्त्री मार्गावर काँग्रेसने पेट्रोल पॅम्पावरून बंद पडलेली कार दोरीने ओढत अनोख्या पद्धतीनं निषेध केला. विशेष म्हणेज मोदींचा मुखवटा घातलेल्या एका कार्यकर्त्याला या गाडीवर बसवण्यात आलं होतं. या वेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. काँग्रेसचे प्रवक्ते चरणसिंग सप्रा यांनी भाजप बरोबरच शिवसेनेवर हि जोरदार टीका केली.
Continues below advertisement