मुंबई : संदीप देशपांडे, संतोष धुरींसह 8 जण आणखी दोन दिवस पोलिस कोठडीत
Continues below advertisement
मुंबईतील काँग्रेसच्या कार्यलयाची तोडफोड केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या मनसेच्या आठ जणांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. किला कोर्टाने हा निर्णय दिला आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यासह संतोष धुरी, संतोष सरोदे, अभय मालप, योगेश छिल्ले, विशाल कोकणे, हरिश सोळुंकी, दिवाकर पडवळ यांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडीतच राहावं लागणार आहे.
Continues below advertisement