मुंबई : काँग्रेसच्या महाआघाडीचं महागणित काय?

Continues below advertisement
पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजप विरोधी 70 टक्के मतं आणि कर्नाटकमध्ये निवडणुकीनंतर झालेली समीकरणं याचा विचार करता महाराष्ट्रात येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी महाआघाडी करण्यासाठी काँग्रेसने पहिलं पाऊल टाकलं आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना यासंदर्भात अहवाल देण्यात येणार आहे.

महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष, बसपा, बहुजन विकास आघाडी, सीपीएम, रिपाई (प्रकाश आंबेडकर) या समविचारी पक्षांबरोबर आघाडी व्हावी यासाठी काँग्रेस अनुकूल असल्याचं काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण  यांनी सांगितलं.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येणाऱ्या निवडणुकीत एक जागा एक उमेदवार हे सूत्र असावं, ज्या जागेवर जो उमेदवार निवडून येईल, तो गुणवत्तेचा निकष धरावा, मतविभाजन टाळावं, अशी चर्चा आज काँग्रेसच्या बैठकीत झाली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram