मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो प्रकल्पाची डेडलाईन 6 महिन्यांनी वाढली
Continues below advertisement
मुंबईतल्या कुलाबा-वांद्रे-सिप्झ या मेट्रो प्रकल्प 3 ची डेडलाईन 6 महिन्यांनी वाढवण्यात आलीय. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडूनच ही माहिती राज्य सरकारला देण्यात आलीय. मेट्रो प्रकल्पाच्या कामाचा आवाका मोठा असल्याचं कारण देत ही डेडलाईन वाढवण्यात आल्याचं कळतंय.
मेट्रो 3 प्रकल्पाचं काम सुरू झाल्यानंतर डिसेंबर 2020 मध्ये हे मेट्रोचं काम पूर्ण होईल अशी डेडलाईन देण्यात आली होती. मात्र आता या नव्या डेडलाईननूसार हे काम जून 2021 मध्ये पूर्ण होईल असं सांगण्यात आलं. मेट्रोच्या कामावर रोज 4.25 कोटी रुपये खर्च होतात. त्यानुसार आता वाढलेल्या डेडलाईननुसार मेट्रोचा खर्च 756 कोटींनी वाढलाय.