मुंबई : मुख्यमंत्री, रेल्वेमंत्री आणि संरक्षणमंत्र्यांची एलफिस्टन स्टेशनला भेट

मुंबईतील एलफिन्स्टन स्थानकावरील फूट ओव्हर ब्रीज बांधण्याची जबाबदारी भारतीय सैन्याकडे दिली जाणार आहे. आज मुख्यमंत्री फडणवीस, रेल्वेमंत्री पियुष गोयल, संरक्षणमंत्री निर्मला सितारमन यांनी एलफिन्स्टन पूलाची पाहणी केली. याशिवाय
करी रोड आणि आंबिवलीचा ब्रिजही मिलीट्रीकडून बांधला जाणार आहे. एरव्ही या कामाला एक वर्ष लागलं असतं मात्र आता हे काम दोन महिन्यात पूर्ण होईल.
एल्फिन्स्टन स्टेशनवर चेंगराचेंगराचेंगरीत 23 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर कमीत कमी वेळेत किंवा तातडीच्या वेळी काम पूर्ण करायचं असल्यास अशा प्रकारच्या बांधकामांची जबाबदारी सैन्याकडे दिली जाते. याआधी कॉमनवेल्थ स्पर्धेवेळी दिल्लीत पूल कोसळल्यानंतर सैन्यानं तो पूल लवकरात लवकर बांधून दिला होता.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola