मुंबई : ओबीसी महामंडळाला 500 कोटींचा निधी मंजूर करणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा
Continues below advertisement
थोर समाजसुधारक महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी शिफारस राज्य राज्यसरकारच्या वतीने केंद्राकडे करण्यात आलीए..
मुंबईतल्या ओबीसी महासंघाच्या अधिवेशनात आज मुख्यमंत्री फडणवीसांनी महत्त्वाच्या घोषणा केल्या... त्यात त्यांनी ही माहिती दिली...
जातिव्यवस्थेचे उच्चाटन करण्यासाठी महात्मा फुले यांनी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांना मरणोत्तर भारतरत्न किताब द्यावा, अशी मागणी विधानसभेत करण्यात आली होती. त्यावर राज्य सरकारच्या वतीने केंद्र सरकारला तशी शिफारस करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं...
तर तिकडे ओबीसी समाजासाठी मोठी घोषणा करण्यात आलीए... ओबीसी समाजाच्या महामंडळांला 500 कोटींचं बजेट मंजूर करु अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. राज्यातील ओबीसी समाजाच्या अडचणी, समस्या केंद्रापर्यंत स्वतः पोहोचवेन, त्यांचे अधिकार त्यांना मिळवून देऊ, असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलंय.