मुंबई : फाशीच्या शिक्षेमुळे निर्भयाच्या आत्म्याला शांती, असा गुन्हा करण्यास कुणी धजावणार नाही : मुख्यमंत्री
Continues below advertisement
संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील सर्व तीनही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी हा निकाल दिला.
जितेंद्र शिंदे, नितीन भैलुमे आणि संतोष भवाळ या तिन्ही नराधमांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली.
सकाळी 11.23 वा न्यायाधीश कोर्टरुममध्ये दाखल झाल्या. त्यानंतर निकालाच्या वाचनाला सुरुवात झाली. अवघ्या सहा मिनिटांच्या आत तीनही दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
खून आणि बलात्काराच्या शिक्षेखाली तिघांनाही जन्मठेप आणि फाशीची शिक्षा झाल्याचं विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सांगितलं.