मुंबई : कोरेगाव भीमा चौकशीसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी मुख्य न्यायमूर्तींची भेट घेतली
Continues below advertisement
भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी चौकशीचं आश्वासन दिल्यानंतर आज मुख्यमंत्र्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची भेट घेतलीय. या भेटीत न्यायायलयीन चौकशीसाठी न्यायाधीशांची नेमणूक करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी केली.. या नेमणुकीसाठी अधिकृत विनंतीचं पत्रदेखील देण्यात आलंय. दरम्यान काही दिवसांपूर्वी भारीप बहुजन संघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मागणी केली होती की या प्रकरणाची चौकशीसाठी दलित समाजातील न्यायाधिश नेमला जाऊ नये.. तेव्हा आता याप्रकरणी काय घडामोडी घडतात आणि प्रत्यक्ष चौकशीला कधी सुरुवात होते हे आता पहावं लागेल..
Continues below advertisement