मुंबई : महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांचं बेमुदत कामबंद आंदोलन
Continues below advertisement
महसूल विभागाच्या तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी आजपासून राज्यव्यापी कामबंद आंदोलन सुरु केलं. राज्यातील नायब तहसीलदार, लिपीक आणि शिपाई या आंदोलनात सहभागी झाले आहेत. राज्यातील 30 हजार कर्मचाऱ्यांनी संपाला पाठिंबा दिल्याचा दावा महसूल कर्मचारी संघटनेनं केला.
राज्यातील महसूल विभागामध्ये गेल्या काही वर्षांपासून अनेक पदं रिक्त आहेत. ही पद तातडीनं भरावीत, कर्मचाऱ्यांना वेतनवाढ द्यावी, पदोन्नती तातडीनं करावी अशा कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत. या संपामुळे राज्यातील अनेक जिल्हाधिकारी कार्यालयांच्या कामावर परिणाम झाला.
Continues below advertisement