मुंबई : दाऊद, पोलिस, नेत्यांचं माझ्याविरोधात षडयंत्र : छोटा राजन
दाऊद इब्राहिम, पोलिस अधिकारी आणि नेते मंडळी माझ्याविरोधात षडयंत्र रचत आहेत, असा गंभीर आरोप कुख्यात डॉन छोटा राजन याने मुंबई हायकोर्टात केला. आपल्यावर अनेक खोट्या केसेस दाखल केल्याचा आरोपही राजनने केला. पत्रकार ज्योर्तिमय डे यांच्या हत्याप्रकरणावरील सुनावणीदरम्यान राजननं हा दावा केला. तसंच जे. डे हत्या प्रकरणात आपला हात नसल्याचंही राजन म्हणाला.