U-19 Asia Cup | अंडर-19 आशिया चषकाचा हीरो अथर्व अंकोलेकरशी बातचीत | ABP Majha

सातव्यांदा आशिया चषक जिंकलेल्या भारतीय अंडर नाईन्टिन क्रिकेट संघाचं काल मुंबईत आगमन झालं. रविवारी बांगलादेशविरुद्धचा अंतिम सामना जिंकून भारताच्या युवा संघानं आशिया चषकातलं आपलं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केलं. अंतिम सामन्यात २८ धावांत पाच विकेट्स घेणाऱा मुंबईचा अथर्व अंकोलेकर भारताच्या या यशाचा शिल्पकार ठरला. त्यामुळे मुंबईत दाखल झाल्यानंतर अंधेरीतल्या त्याच्या घरापर्यंत त्याची विजयी मिरवणूक काढण्यात आली. अथर्वची आई बेस्टमध्ये कंडक्टर म्हणून सेवेत आहे. कंडक्टरच्या या मुलानं अंडर नाईन्टिन आशिया चषकात भारताच्या विजयात मोलाचं योगदान बजावलं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola