Balbharati | बालभारतीच्या संख्यावाचनातील बदलाची नेमकी गरज काय? | विशेष चर्चा | ABP Majha
बालभारतीच्या इयत्ता दुसरीतील गणिताच्या पुस्तकात नवे बदल करण्यात आल्याने संताप व्यक्त केला जात. 21 ते 99 हे आकडे आता यापुढे जोडाक्षराप्रमाणे नाही, तर संख्यावाचनाप्रमाणे शिक्षकांनी शिकवायचे आहेत. म्हणजेच 32 या आकड्याचा थेट बत्तीस असा उल्लेख न करता 'तीस दोन' असा उल्लेख करावा लागेल. यावरुन विरोधकांनी चांगलंच धारेवर धरलं आहे. जोडाक्षरामुळे विद्यार्थ्यांचा संभ्रम होत असून गणिताची नावड निर्माण होत असल्याचं बालभारतीचं म्हणणं आहे. शिवाय इंग्रजीसोबतच कानडी, तेलगू, तामिळ भाषांमध्येही अशाच प्रमाणे शिक्षण होत असल्याचं बालभारतीनं सांगितलं आहे.