घाटकोपर विमान दुर्घटना: पायलट मारिया यांच्या पतीचे आरोप

Continues below advertisement
घाटकोपच्या सर्वोदय रुग्णालयाजवळ जीवदया लेनमध्ये दुपारी दीडच्या सुमारास चार्टर्ड़ विमान कोसळलं. या विमान दुर्घटनेत वैमानिकासह, कोपायलट आणि २ तंत्रज्ञांचा मृत्यू झालाय. एक पादचारीही यात मृत्यूमुखी पडला. तर दोन जण जखमी झाले आहेत.
पायलट प्रदीप राजपूत, को पायलट मरिया झुबेरी, तंत्रज्ञ सुरभी, मनीष पांडे अशी मृत्यू झालेल्या वैमानिक आणि तंत्रज्ञांची नावं आहेत. तर गोविंद पंडित असं मृत पादचाऱ्याचं नाव आहे.
दुर्घटनाग्रस्त व्हीटी यूपीझेड, किंग एअर सी-90 हे चार्टर्ड विमान यूपी सरकारचं खासगी विमान होतं. मात्र हे विमान काही दिवसांपूर्वी यूपी सरकारने विकलं होतं.
दरम्यान अग्नीशमन दलाच्या जवानांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत, विमानाला लागलेली आग विझवली आणि विमानातील मृतदेह बाहेर काढले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram