मुंबई : खराब वातावरणातही चाचणी करायला लावली, वैमानिक मारियांच्या पतीचा आरोप
Continues below advertisement
खराब हवामान असतानाही कंपनीनं विमान टेक ऑफ केल्याचा धक्कादायक आरोप पायलट मरिया झुबेरी य़ांचे पती अॅडव्होकेट प्रभात यांनी केलाय
घाटकोपर पश्चिमेकडील जीवदया लेन परिसरात चार्टर्ड विमान कोसळलं. भर वस्तीत, रहिवाशी भागात विमान कोसळल्याने परिसरात भीतीचं वातावरण आहे. या दुर्घटनेत एका पादचाऱ्यासह विमानातील चारही जणांचा मृत्यू झाला. दुपारी दीडच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
दुर्घटनाग्रस्त व्हीटी यूपीझेड, किंग एअर सी-90 हे चार्टर्ड विमान यूपी सरकारचं खासगी विमान होतं. मात्र हे विमान काही दिवसांपूर्वी यूपी सरकारने विकलं होतं.
या विमानात पायलट आणि 3 तंत्रज्ञ असे एकूण चार जण होते. यामध्ये दोन महिलांचाही समावेश होता. या चौघांचा आणि एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.
पायलट मारिया झुबेरी, को पायलट प्रदीप राजपूत, तंत्रज्ञ सुरभी, मनीष पांडे यांचा मृत्यू झाला. तर पादचारी गोविंद पंडित यांचाही या अपघातात दुर्दैवी अंत झाला.