मुंबई : उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीनंतर चंद्रकांत पाटलांशी बातचित
Continues below advertisement
मंत्रिमंड़ळातला प्रवेश लांबणीवर पडल्यानंतर आता नारायण राणेंना विधान परिषदेतही संधी मिळणार नसल्याची चिन्ह दिसताहेत. आज मातोश्री बंगल्यावर उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांच्यात बैठक झाली. विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी राणेंऐवजी भाजपातल्याच उमेदवाराला संधी देण्यात येईल अशी माहिती चंद्रकांतदादांनी उद्धव यांना दिल्याचं सुत्रांकडून समजतंय. तर राणेंच्या मंत्रिमंडळ प्रवेशाबाबत उद्धव ठाकरेंना ठोस निर्णय कळवण्यास चंद्रकांत पाटलांनी टाळलंय.. दरम्यान 27 नोव्हेंबरला विधानपरिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळं राणे विधानपरिषदेवर जाणार की नाही हे 27 तारखेलाच स्पष्ट होईल..
Continues below advertisement