मुंबई : मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय मागास आयोगाकडे- चंद्रकांत पाटील

Continues below advertisement
आरक्षण देणं हे आमच्या हातात नाही.  समाजासाठी योजना देणं, फीमध्ये सवलत देणं अशा गोष्टी आमच्या हातात आहेत आणि त्या आम्ही लागू करत आहोत. आरक्षणाचा निर्णय पूर्णपणे मागासवर्गीय आयोगाच्या हातात असल्य़ाचं सांगत, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आरक्षणाचा चेंडू मागास आयोगाकडे ढकलला आहे. दरम्यान, सरकारनं मेडिकलचं शिक्षण घेणाऱ्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांना फीमध्ये मोठी सवलत दिली आहे. यावेळी पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वक्तव्याचाही समाचार घेतला. पाटील यांनी आज मुंबईत पत्रकारांशी बोलताना विविध मुद्द्यांना हात घातला. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram