VIDEO | मुंबईतील चांदिवली परिसरात बहीण प्रियासाठी संजय दत्तचा रोड शो | मुंबई | एबीपी माझा
उत्तर मध्य मुंबईच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रिया दत्त यांच्या प्रचारासाठी त्यांचा भाऊ संजूबाबा पुढे आलाय. मुंबईतल्या चांदिवली भागात संजय दत्तनं चांदिवलीत रोड शो केला. यावेळी जमलेल्या गर्दीला संजूबाबानं प्रिया दत्तला मतं देण्याचं आवाहन केलंय. शिवाय, सिनेअभिनेता म्हणून नाही तर, प्रिया दत्तचा भाऊ म्हणून तिच्यासाठी मतदान मागायला आलो असल्याचं संजय दत्तनं एबीपीशी बोलताना सांगितलंय. प्रिया दत्त यांच्यासमोर भाजपच्या पूनम महाजन यांचं आव्हान आहे.