मुंबई: छगन भुजबळ आज फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधणार
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आज कार्यकर्त्यांशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधणार असल्याचं कळतंय. मनी लाँड्रींगप्रकरणी अटकेत असलेल्या भुजबळांची तांत्रिक सुटका झाली आहे. मात्र आज सुटकेनंतर मुंबईत त्यांना कार्यकर्ते भेटायला येण्याची शक्यता आहे. त्यामुळे निर्माण होणारी गर्दी टाळण्यासाठी भुजबळ फेसबुकचाद्वारेच संवाद साधणार असल्याची माहिती मिळतेय.