मुंबई : परिचालकांचं निलंबन रद्द करण्यावरुन चंद्रकांत पाटील आणि कपिल पाटील आमनेसामने
Continues below advertisement
आमदार प्रशांत परिचारक यांचं निलंबन मागे घेण्यावरुन आज विधानभवनात जोरदार गोंधळ पाहायला मिळाला.
परिचारक यांच्याबद्दल प्रश्न विचारल्यानं महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आपल्या अंगावर धावून आले, त्यांनी 'मी तुला बघून घेईन' अशी धमकी दिल्याचा गंभीर आरोप शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी केलाय.
विधीमंडळात घडलेल्या या घटनेचे स्वत: सभापती आणि सर्व आमदार साक्षीदार आहेत. त्यामुळे इतकं गंभीर वर्तन करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांनी आत्मपरिक्षण करावं, आणि दिलगिरी व्यक्त करावी असंही कपिल पाटील यांनी म्हटलंय. इतकंच नव्हे तर लोकशाहीत प्रत्येकाला आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे, मात्र अशा पद्धतीने आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकारकडून होणार असेल तर ते अधिक गंभीर असल्याचं कपिल पाटील म्हणाले.