मुंबई : सीबीएसई परीक्षेत घवघवीत यश मिळवणाऱ्या गुणवंतांच्या यशाचं गमक

Continues below advertisement
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या निकालाचं वैशिष्ट्य म्हणजे 500 पैकी 499 गुण मिळवत एक, दोन नव्हे तर चार विद्यार्थी बोर्डात अव्वल आले आहेत.
या चार विद्यार्थ्यांमध्ये तीन मुलींचा समावेश आहे. डीपीएस गुरुग्राममधील प्रखर मित्तल, आरपी पब्लिक स्कूलची रिमझिम अग्रवाल, शामली शाळेतली नंदिनी गर्ग आणि कोच्चीतल्या भवानी विद्यालयातली श्रीलक्ष्मी यांनी 499 गुण मिळवत पहिला क्रमांक पटकावला आहे.
यावर्षी दहावीचा निकाल 86.70 टक्के लागला. यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा मुलींचा निकाल मुलांपेक्षा 3.35 टक्क्यांनी जास्त आहे. दहावी बोर्डात यंदा दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये 489 गुणांसह अनुष्का पांडा आणि सान्या गांधी यांनी पहिला क्रमांक मिळवला. तर सौम्यदीप प्रधानने 484 गुणांसह तिसरं स्थान मिळवलं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram