VIDEO | राज ठाकरे-भाजप समर्थकांमध्ये व्यंगचित्र वॉर | एबीपी माझा

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि भाजपमध्ये व्यंगचित्र वॉर पाहायला मिळालं... मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. स्वतंत्रते न बघवते असं शीर्षक या व्यंगचित्राला देण्यात आलं.. मोदी आणि शाह हे दोघे लाल किल्ल्यावर लोकशाहीला फासावर लटकवत असल्याचं व्यंगचित्रातून दाखवण्यात आलं आहे. राज ठाकरेंच्या या व्यंगचित्रानं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला...मात्र राज ठाकरे यांच्या आजच्या व्यंगचित्रात बाळासाहेब ठाकरे यांनी तब्बल 39 वर्षांपूर्वी काढलेल्या व्यंगचित्राची झलक दिसत आहे. बाळासाहेबांचे हे व्यंगचित्र 21 सप्टेंबर 1980 च्या मार्मिक अंकामध्ये प्रसिद्ध झाले होते.
राज यांच्या व्यंगचित्राला भाजपकडूनही अच्छे दिन न बघवते अशा व्यंगचित्रानं प्रसिद्ध केलं,,,या दोन्ही व्यंगचित्रामुळे सोशल मीडिया चांगलाच खवळलाय..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola