मुंबई : धर्मा पाटील यांच्या प्रकरणावर मंत्रिमंडळ बैठकीत साधी चर्चाही नाही

Continues below advertisement
मंत्रालयात आत्महत्या करणारे शेतकरी धर्मा पाटील यांच्या प्रकरणावर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणतीही चर्चा झाली नाही. धुळ्यातील औष्णिक विद्युत प्रकल्पासाठी धर्मा पाटील यांनी जमीन दिली होती. मात्र त्यांना जमिनीचा योग्य मोबदला मिळाला नसल्याने त्यांनी मंत्रालयात विषप्राशन करुन आत्महत्या केली.

धर्मा पाटील यांच्या जमिनीसंदर्भातला अहवाल धुळ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी देणं अपेक्षित होतं. गेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यांनी धर्मा पाटील आत्महत्येप्रकरणी मुख्यमंत्र्यांना धारेवर धरलं होतं. त्यामुळे मंत्रिमंडळात यासंदर्भात राज्य सरकार निर्णय देईल, अशी अपेक्षा होती.

एक आठवडा उलटूनही धर्मा पाटील आत्महत्या प्रकरणात सरकार उदासिन असल्याचं या निमित्ताने दिसून आलं. आजच्या कॅबिनेट बैठकीत धर्मा पाटील आत्महत्या प्रकरणाचा चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य सचिवांना दिले होते. मात्र अहवालाबाबत सरकारची टोलवाटोलवी सुरूच आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram