नवी दिल्ली | पंतप्रधान मोदींच्या ड्रीम प्रोजेक्टला ब्रेक, जपानने बुलेट ट्रेनचा फंड रोखला!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बुलेट ट्रेनच्या ड्रीम प्रोजेक्टला आणखी एक झटका बसला आहे. या प्रकल्पाला अर्थसहाय्य करणारी जपानी कंपनी जपान इंटरनॅशनल को ऑपरेशन एजन्सीने (जीका) पैसा पुरवणं थांबवलं आहे. पालघरच्या शेतकऱ्यांनी बुलेट ट्रेनला विरोध केला आहे. त्या पार्श्वभूमीवर जपानी कंपनीने मोदी सरकारला शेतकऱ्यांची समस्या सोडवण्यास सांगितलं आहे. 1 लाख कोटी रुपये किमतीचा मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प आहे. त्यासाठी गुजरात आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या जमिनींचं अधिग्रहण सुरु आहे. मात्र महाराष्ट्रातील शेतकरी त्याला विरोध करत आहेत. या वादानंतर केंद्र सरकारने एका विशेष समितीची स्थापना केली आहे. त्यानंतर आता जपानच्या कंपनीने अर्थसहाय्य रोखलं आहे. मोदी सरकारने आधी शेतकऱ्यांची समस्या सोडवावी असं या कंपनीने म्हटलं आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola