मुंबई : ओसीशिवाय आता इमारत हस्तांतरणास परवानगी
Continues below advertisement
इमारतीचं हस्तांतरण आता सोपं होणार आहे.अनेक किचकट प्रक्रियेनंतर सोसयटीकडे इमारतीच्या जमिनीची मालकी येते. मात्र, आता या सर्व जाचक अटी रद्द करण्यात आल्यात. केवळ बांधकाम सुरू झाल्याचा आणि पूर्णत्वाचा दाखला बाळगणाऱ्या इमारतींनाही सहजपणे डीम्ड कन्व्हेअन्स प्राप्त करता येणार आहे. ही प्रक्रिया सुटसुटीत करण्याबाबत नेमण्यात आलेल्या समितीच्या शिफारसी राज्य सरकारने मान्य केली. आणि तसा आदेश काढलाय.
मुंबईसह ठाणे, पुणे, नागपूर यांसारख्या शहरांत जमिनीच्या मालकीवरून सोसायटी आणि विकासकांमध्ये वाद असल्याने अनेक इमारतींचा पुनर्विकास रखडलेला आहे. तो आता सुकर होईल.
मुंबईसह ठाणे, पुणे, नागपूर यांसारख्या शहरांत जमिनीच्या मालकीवरून सोसायटी आणि विकासकांमध्ये वाद असल्याने अनेक इमारतींचा पुनर्विकास रखडलेला आहे. तो आता सुकर होईल.
Continues below advertisement