Police Bravery Award | 110 पोलिसांचा शौर्यपुरस्काराने गौरव, तर 6 माजी पोलिस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक | ABP Majha
Continues below advertisement
महाराष्ट्र राज्य पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा शौर्यापदकाने गौरवण्यात आलं. पोलिस महासंचालक कार्यालयातील सभागृहात राज्यपाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. गुणवत्ता सेवेसाठी 110 पोलीस कर्मचाऱ्यांना पदक देऊन सन्मानित करण्यात आले तर उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पदक राज्यातील 6 माजी पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. राज्यातील नक्षली भागात नक्षल विरोधी कारवाया करताना आपल्या जीवाची बाजी लावून कर्तव्य पार पडणाऱ्या 24 जवानांना शौर्यपदक देऊन सन्मानित करण्यात आले.
Continues below advertisement