मुंबई पाऊस: तुफान पावसाने लोकल, रस्ते वाहतुकीवर परिणाम
Continues below advertisement
मुंबईत गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेली पावसाची संततधार थांबायचं नावच घेत नाहीये... काल दिवसभर पावसाने अक्षरशा मुंबईला झोडपून काढल्यानंतरही मध्यरात्रीपासून मुंबईतला मुसळधार पाऊस सुरुच आहे...दक्षिण मुंबईसह अंधेरी, मालाड, बोरिवली, घाटकोपर भागात रात्रभर मुसळधार पाऊस सुरु आहे... त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी आणि घरात पाणी शिरल्याच्या घटना घडल्या... किंग्ज सर्कल, सायन अशा सखल भागात मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा पाणी साचलं...आज दिवसभरही असाच पाऊस सुरु राहिल्यास मुंबईकरांना आठवड्याच्या दुसऱ्या दिवशीही मोठा त्रास सहन करावा लागणार आहे... दरम्यान मुंबई आणि ठाणे परिसरात येत्या पाच दिवसात अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलीय...
Continues below advertisement