VIDEO | माजी पोलीस महासंचालक मेढेकरांच्या पुस्तकाचं प्रकाशन | मुंबई | एबीपी माझा

राज्याचे माजी पोलीस महासंचालक कृ.पां. मेढेकर यांच्या लेखांचं संकलन केलेल्या 'एका अस्वस्थ पिढीची वाटचाल' या पुस्तकाचं राज्याचे विद्यमान पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांच्या हस्ते नुकतंच प्रकाशन झालं. पोलीस जिमखान्यावर पार पडलेल्या या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला माजी पोलीस महासंचालक ज्युलियो रिबेरो यांच्यासह राज्यसभा खासदार आर.के.सिन्हा आदी मान्यवर उपस्थित होते. भारत हाटेंच्या सीमा प्रकाशनने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.  पु.ल.देशपांडे यांनी मेढेकर यांच्या साहित्याबद्दल त्यांना पाठवलेले पत्र हेही या पुस्तकाचे आकर्षण आहे. याशिवाय मेढेकरांच्या काही कवितांचाही संग्रह या पुस्तकात आहे. याशिवाय मेढेकरांच्या प्रवासातील काही महत्त्वाच्या क्षणांची छायाचित्रेदेखील या पुस्तकात आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola