मुंबई: 8 आणि 9 जूनला अतिवृष्टीचा इशारा, अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

Continues below advertisement
उद्या आणि परवाच्या संभाव्य अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे मुंबई महापालिका अधिकाऱ्यांच्या शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबईकरांनाही या संभाव्य इशाऱ्यानंतर सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय.
पर्जन्य जलवाहिन्यांची पाहणी करुन त्या योग्य आहेत की नाही, याची खातरजमा केली जात आहे. त्याबरोबर नौदल, अग्निशमन दल आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक असे विभागही सज्ज आहेत. मुंबईकरांनी तुंबलेल्या रस्त्यावरुन चालताना खबरदारी घ्यावी, गरज असेल तरच बाहेर पडावं, धोकादायक इमारत किंवा झाडाच्या आडोशाला उभं राहणं टाळावं अश्या अनेक सूचना करण्यात आल्या आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram