मुंबई : कमला मिल्स अग्नितांडव प्रकरणाचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर
Continues below advertisement
कमला मिलमधील आग आग ही मोजोस बिस्त्रोतील हुक्का पार्लरमुळेच लागल्याचं आता स्पष्ट झालं आहे. त्यासंदर्भातील अहवाल मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला आहे. मोजोस बिस्त्रोतील हुक्का पार्लर विनापरवाना गच्चीवर थाटण्यात आलं होतं. त्या जागेचे आणि रेस्ट्रॉरन्टच्या मालक या आगीला जबाबदार असल्याचा ठपका या अहवालात ठेवण्यात आला आहे. दरम्यान हा अहवाल सार्वजनिक करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. या अहवालानूसार फायर ब्रिगेडमधील 10 अधिकाऱ्यांची खातेअंतर्गत चौकशी होणार आहे. तर दोन वॉर्ड ऑफिसर आणि आरोग्य अधिकाऱ्यांचाही चौकशीत समावेश असेल. 29 डिसेंबरला मध्यरात्री कमला मिलमधील मोजोस आणि वन अबव्ह पबला लागलेल्या आगीत 14 जणांचा मृत्यू झाला होता.
Continues below advertisement