Ajoy Mehta | अजॉय मेहता आजच मुख्य सचिवपदाचा कार्यभार स्वीकारणार | मुंबई | ABP Majha

मुंबई महापालिकेचे आयुक्त अजॉय मेहता राज्याच्या मुख्य सचिवपदाचा कार्यभार सांभाळणार आहेत. आचारसंहितेमुळे सामान्य प्रशासन विभागाच्या रखडलेल्या प्रस्तावाला निवडणूक आयोगानं हिरवा कंदील दाखवलाय. त्यामुळे आज अजॉय मेहता यांची राज्याचे मुख्य सचिव म्हणून अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. तर, मुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त सचिव प्रवीण परदेशी यांची मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती होण्याची शक्यता आहे. दरम्यान, सप्टेंबरमध्ये ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजॉय मेहता निवृत्ती घेणार आहेत. त्यामुळे त्यांच्यानंतर प्रवीण परदेशी राज्याचे मुख्य सचिव होणार असल्याची चर्चा प्रशासनात जोरदार रंगतेय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola