मुंबई : महापालिकेने प्रभादेवीतील ट्रान्झिट कॅम्पचं वीज, पाणी कनेक्शन तोडलं
Continues below advertisement
पावसाळ्याच्या तोंडावर मुंबई महागरपालिकेनं धोकादायक इमारतींवर कारवाईला सुरुवात केली आहे. मात्र यावरुन प्रभादेवी भागात रहिवासीविरुद्ध पालिका असा वाद उभा राहिला आहे. प्रभादेवीच्या हातिस्कर वाडीतील ट्रान्झिट कॅम्पच्या इमारतीला धोकादायक ठरवत त्याचं वीज आणि पाण्याचं कनेक्शन तोडण्यात आलं आहे. मात्र ही इमारत धोकादायक नसल्याचा दावा रहिवाशांनी केला आहे. इथल्या रहिवाशांनी खासगी ऑडिट केलं. त्यात इमारत धोकादायक नसल्याचं समोर आलं आहे. मात्र पालिकेच्या कारवाईमागे बांधकाम व्यावसायिकाचा हात असल्याचा आरोप इथले नागरिक करत आहेत. या ट्रान्झिट कॅम्पमध्ये 40 कुटुंब राहतात. सध्या ते रस्त्यावर येणार आहेत.
Continues below advertisement