कमला मिल्स कम्पाऊण्ड आग : रघुवंशी मिल परिसरात हॉटेलवर पालिकेची कारवाई
Continues below advertisement
लोअर परेलच्या कमला मिल्स कम्पाऊंडमधील अग्नितांडवात 14 निष्पापांचा बळी गेल्यानंतर मुंबई महापालिकेला जाग आली आहे. महापालिकेने कमला आणि रघुवंशी मिल्स कम्पाऊंडमधील चार हॉटेलवर तोडकामाची कारवाई केली आहे. ही कारवाई आजही सुरु राहणार आहे. कारवाईसाठी झोनल डीएमसी, वॉर्ड आफिसर, वैद्यकीय अधिकारी, अग्निशमन दलाचे अधिकाऱ्यांचा समावेश असलेलं पथक यासाठी तयार करण्यात आलं आहे.
Continues below advertisement