मुंबई : महापालिकेच्या अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांना दिलासा, करात कोणतीही वाढ नाही
यंदाच्या अर्थसंकल्पात मुंबई महापालिकेने सर्वाधिक जोर शिक्षणावर दिला आहे. 2018-19 या आर्थिक वर्षासाठी शिक्षणासाठी 2569 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात ही तरतूद 2311 कोटी रुपये होती.
महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी 2018-19 या आर्थिक वर्षासाठी 27 हजार 258 कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. गेल्या वर्षी 25 हजार 141 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. यावर्षीच्या अर्थसंकल्पात सर्वात दिलासादायक बाब म्हणजे करात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.