BJP Manifesto | फुले दाम्पत्य आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांना 'भारतरत्न' मिळावा यासाठी पाठपुरावा करणार, भाजपचं आश्वासन
महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न मिळावा ही मागणी सातत्याने केली जात आहे. हीच मागणी लक्षात घेत सावरकर आणि फुले दाम्पत्यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा, यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. विधानसभा निवडणुकीसाठीचा भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला आहे. वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.