मुंबई : वनगा कुटुंबीयांना परत पाठवा, आम्ही त्यांचं पुनर्वसन करु : भाजपची शिवसेनेला विनवणी
पालघर पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज अंतिम मुदत आहे, मात्र अजूनही भाजपला शिवसेनेकडून आशा आहे. वनगा कुटुंबीयांना भाजपमध्ये पाठवा, त्याचं आम्ही पुनर्वसन करु, असा प्रस्ताव भाजपने शिवसेनेला दिला आहे.
श्रीनिवास वनगांना लोकसभेची उमेदवारी किंवा विधानपरिषदेची आमदारकी दिली जाईल, असं भाजपने म्हटलं आहे. मात्र शिवसेनेने या प्रस्तावावर अजून काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
श्रीनिवास वनगांना लोकसभेची उमेदवारी किंवा विधानपरिषदेची आमदारकी दिली जाईल, असं भाजपने म्हटलं आहे. मात्र शिवसेनेने या प्रस्तावावर अजून काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.