मुंबई : भाजप आमदार प्रसाद लाड यांचा काँग्रेस नेत्यांविरोधात 500 कोटींची अब्रुनुकसानीचा दावा
Continues below advertisement
भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वाराज चव्हाण, काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम या नेत्यांवर ५०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. सोमवारी काँग्रेसच्या या नेत्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत लाड यांच्यावर नवी मुंबई येथील भुखंड खरेदीसाठी बेकायदेशीरपणे बिल्डरला मदत केल्याचा आरोप केला होता. त्या अनुषंगाने लाड यांनी मुंबई उच्च न्यायालयात हा दावा दाखल केला आहे.
Continues below advertisement