मुंबई : ख्रिश्चनांबद्दल वादग्रस्त वक्तव्य, भाजप खासदार गोपाळ शेट्टी राजीनाम्याच्या तयारीत?
भाजपचे उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी राजीनामा देण्याच्या तयारीत आहे. ख्रिश्चन धर्मीयांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर, पक्षश्रेष्ठींनी गोपाळ शेट्टी यांना झापल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर गोपाळ शेट्टी यांनी राजीनाम्याची तयारी दर्शवली आहे. मला कोणत्याही पदापेक्षा वाणी स्वातंत्र्य, बोलण्याचं स्वातंत्र्य महत्त्वाचं आणि प्रिय आहे. पक्षाने सांगण्याअगोदर मी दुपारी एक वाजेपर्यंत निर्णय जाहीर करेन. पक्षाने कारवाई करण्याची वाट पाहणार नाही, असं गोपाळ शेट्टी म्हणाले. पदापेक्षा वाणीस्वातंत्र्य जास्त महत्त्वाचं आहे. वाणीस्वातंत्र्यावर गदा आणणारं पद मला नको. त्यामुळे मी आज एक वाजता निर्णय घेणार आहे, असं गोपाळ शेट्टी यांनी सांगितलं.