मुंबई: भाजपच्या महामेळाव्याने मुंबईत वाहतूक कोंडी, प्रवाशांना मनस्ताप
Continues below advertisement
स्थापना दिनानिमित्त भाजपने मुंबईत महामेळाव्याचं आयोजन केलं आहे. मात्र या कार्यक्रमामुळे सर्वसामान्य मुंबईकरांना मोठा मनस्ताप होत आहे.
पश्चिम द्रूतगती मार्गावर कालपासून मोठी वाहतूक कोंडी होत आहे. काल अमित शाहांच्या स्वागतासाठी भाजपने सांताक्रूझ विमानतळ ते बीकेसीपर्यंत बाईक रॅली काढली होती. मात्र यामुळे तब्बल 4 ते 5 तास वाहतूक रखडली होती.
आजही भाजप कार्यकर्त्यांना घेऊन अनेक बसेस येत आहेत. मात्र यामुळे मोठी वाहतूक कोंडी होत आहे.
Continues below advertisement