औरंगाबाद : एकनाथ खडसे, मोहन प्रकाश आणि पृथ्वीराज चव्हाणांची भेट
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आणणारी आज एक घटना घडली आहे. औरंगाबाद विमानतळावर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची भेट झाली.
विशेष म्हणजे मोहन प्रकाश, पृथ्वीराज चव्हाण आणि एकनाथ खडसे या तिघांनी विमानातूनही दिल्लीपर्यंत एकत्रित प्रवास केला. मोहन प्रकाश हे काँग्रेसचे राज्य प्रभारी आहेत. त्यामुळे त्यांची खडसेंशी भेट झाल्याने राजकीय वर्तुळातील चर्चांना उधाण आले आहे.
तिघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, हे अद्याप कळू शकलेले नाही.